S M L

'फुगे'मध्ये स्वप्नील जोशी स्त्रीच्या अवतारात

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 12:35 PM IST

'फुगे'मध्ये स्वप्नील जोशी स्त्रीच्या अवतारात

31 जानेवारी : बॉलिवूडमध्ये नायकाने स्त्रीची वेशभूषा करणं ही काही नवीन गोष्ट नाही.अमिताभ बच्चन,आमिर खान, शर्मन जोशी तसेच रितेश देशमुख या हिंदीच्या स्टार नायकांनी देखील स्त्री व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत.आता मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी लवकरच त्याच्या चाहत्यांना स्त्री अवतारात पाहायला मिळणार आहे.

आगामी 'फुगे' या सिनेमातील एका सीनसाठी स्वप्नीलने हा अवतार धारण केल्याचं समजतंय.लाल रंगाचा लेडीज टॉप, त्याला साजेशी लिपस्टिक आणि काळे डूलदार कानातले घातलेल्या स्वप्नीलचा हा गर्ली लूक त्याच्या स्त्री चाहत्यांना अचंबित करून सोडणारा आहे.

स्वप्नीलसोबत सिनेमात सुबोध भावेही आहे. आणि दोघांची वेगळी केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुगे 10 फेब्रुवारीला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close