S M L

लातूरमध्ये विषारी वायूमुळे 9 मजुरांचा मृत्यू,मालकासह चौघांना अटक

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 12:34 PM IST

 लातूरमध्ये विषारी वायूमुळे 9 मजुरांचा मृत्यू,मालकासह चौघांना अटक

31 जानेवारी : लातूरमध्ये कीर्ती गोल्ड ऑईल मिलमध्ये विषारी वायूमुळे 9 मजुरांचा मृत्यू झालाय.काल दुपारची ही घटना आहे.मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर कीर्ती मिलच्या मालकासह चौघांना अटक करण्यात आलीय.

कीर्ती गोल्ड ऑईल मिलमध्ये एक मोठा चेंबर साफ करण्यासाठी २ ते ३ मजूर चेंबरमध्ये गेले. साफ करण्यासाठी त्यांनी एक रसायन वापरलं. चेंबरमधले केमिकल्स आणि सफाईसाठीचं केमिकल यांच्यात रासायनिक प्रक्रिया झाली, आणि विषारी वायू निर्माण झाला. यात हे मजूर बेशुद्ध पडले, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे मजूर बाहेर का आले नाही म्हणून आणखी एक मजूर आत गेला. तोही बाहेर आला नाही. त्याला पाहायला एक मजूर पुन्हा आत गेला,असं करून एकूण ७ मजूर दगावले. शेवटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर हा प्रकार समोर आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 09:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close