S M L

घाटकोपरमध्ये शिवसैनिकांमध्ये राडा

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2017 10:42 PM IST

घाटकोपरमध्ये शिवसैनिकांमध्ये राडा

30 जानेवारी : शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. मात्र, आता हा राडा रस्त्यावर उतरलाय. भाजपमधून सेनेत दाखल झालेले मंगल भानुशाली यांच्यावर शिवसैनिकानीच हल्ला चढवलाय.

घाटकोपर पूर्व मधील भाजपचे पदाधिकारी मंगल भानुशाली यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यानंतर भानुशाली हे पंतनगर मधील शिवसेना शाखा 131 मधे येत असताना काही शिवसैनिकांनी भानुशाली यांच्या कारच्या काचा फोडल्या. भानुशाली यांनी प्रवेश घेऊन 131 वार्ड मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाल्याने ही घटना घडल्याचं समजतंय. पोलिसांत मात्र याबाबत तक्रार देण्यात आली नसून शिवसेनेच्या शाखेजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 10:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close