नागपूरच्या सहपोलीस आयुक्तांना काँग्रेसकडून 'जनरल डायर' पुरस्कार

  • Share this:

nagpur_police30 जानेवारी : नागपूरच्या सहपोलीस आयुक्तांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनरल डायर पुरस्कार दिलाय. नथुराम गोडसेवरच्या ' हे राम नथुराम' या नाटकावरून जो वाद झाला त्याबद्दल काँग्रेसने हे निषेध आंदोलन केलंय.

नथुराम गोडसेवरच्या नाटकाला नागपूरमध्ये विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्याचा इशारा देणारा फलक नागपूर पोलिसांनी लावला होता. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सह पोलीस आयुक्तांना हा पुरस्कार दिला.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पुरस्कार नागपूरचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना प्रदान केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेवरच्या नाटकाचा २२ जानेवारीला नागपूरमध्ये प्रयोग होता.  नागपूरमध्ये या नाटकाचा निषेध करण्यासाठी काँग्रेससह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.  यावेळी पोलिसांनी त्यांना गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक दाखवला होता.

या प्रकारामुळे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन झाल्याचा आक्षेप घेत काँग्रेसने हे निषेध आंदोलन केलंय.  सरकारने नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केलीय. नागपूर शहरातले काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सह पोलीस आयुक्तांना हा जनरल डायर पुरस्कार देण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading