मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये सेना भाजपनं एकत्र लढावं -चंद्रकांत पाटील

मुंबई वगळता महाराष्ट्रामध्ये सेना भाजपनं एकत्र लढावं -चंद्रकांत पाटील

  • Share this:

FMNAIMAGE31440Kolhapur_Chandrakant Patil

संदीप राजगोळकर,कोल्हापूर 30 जानेवारी : एकीकडे युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. तर दुसरीकडे मुंबई सोडून महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपनं एकत्र निवडणूक लढवावी असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांना केलंय

कोल्हापूरमध्ये त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 115 जागा नक्की मिळणार असून महापौर हा भाजपचाच होईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसंच राज्यात शिवसेना भाजपची युती तुटल्यावर राज्य सरकार पडेल की काय अशी चर्चा सुरू असतानाच चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

भाजप शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असल्यामुळे टीका इतकी जहरी करुन नये की नंतर पुन्हा एकत्र येण्यात कोणत्या अडचणी येतील असा सल्लाही त्यांनी दोन्ही पक्षांना दिलाय.

तर राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा ही स्वाभाविक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच मुंबई सोडून महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपनं एकत्र निवडणूक लढवावी असंही आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांना केलंय. त्यामुळे आता राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सेना भाजप एकत्र लढवणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 30, 2017, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading