S M L

21 तारखेनंतर माफिया घरी बसणार,सोमय्यांचं सेनेवर टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2017 07:51 PM IST

somiya_on_senaविवेक कुलकर्णी, मुंबई.30 जानेवारी : गोरेगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्याविरोधात केलेल्या टीकेला भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  माफियांचा आवाज बसवताना, माफियांना घरी पाठवताना आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतायत कारण महापालिकेचे सत्ताधारी माफियांचं समर्थन करतायत ते करत असताना मुख्यमंत्र्यांचा किंवा माझा आवाज बसला तर काहीही हरकत नाहीये. लोकांचा आवाज मोठा झाला पाहिजे अशा शब्दात सोमय्या यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

सामनातील टीकेवर प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी  २१ फेब्रुवारीनंतर मुंबईतील माफिया घरी बसणार आहे. त्यामुळे मुंबईसाठीच्या व्हिजनच्या अंमलबजावणीचे काम आम्ही आमच्या घरी बसून स्वस्थपणे करु असा टोमणाही सोमय्यांनी लगावला.

आमचा कार्यक्रम स्पष्ट आहे, मुंबई महापालिकेतील माफियांना फेकून देणं, त्यावरून लक्ष्य हटवण्यासाठी आमच्यावर टीका केली जातेय, सडलेली मुंबई नीट करण्यासाठी आम्ही काम करणार. याच्यामध्ये लक्ष हटवण्यासाठी कोणी व्यक्तिगत टीका केली असेल तर आम्ही लक्ष देणार नाही उलट शिवसेनेनं मुंबईतल्या माफियांबद्दल उत्तर द्यावं असा पलटवारही सोमय्यांनी शिवसेनेवर केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 06:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close