S M L

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलवसुली थांबवा नाहीतर एसीबीकडे तक्रार'

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2017 07:35 PM IST

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलवसुली थांबवा नाहीतर एसीबीकडे तक्रार'

Mumbai PuneToll30 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोलची रक्कम कंत्राटदारानं टोल रक्कम पूर्ण वसूल करुनही अजून टोल सुरू असल्यानं त्यांचे पथकर वसुलीचे अधिकार काढून घेण्याबद्दलचा निर्णय सरकारनं येत्या १५ दिवसांत घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा टोल अभ्यासकांनी दिला आहे.

या मुद्यावर टोल अभ्यासक प्रवीण वाटेगावकर, श्रीनिवास घाणेकर, विवेक वेलणकर, संजय शिरोडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. याबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत पत्रव्यवहार करूनही काहीच पाऊल उचलले नाही उत्तर दिले नाही या मुळे सरकारच्या भूमिकेबाबत शंका आहे अशी तक्रार या सगळ्या अभ्यासकांनी मांडली.

2018-19 ला 2869 कोटी वसूल होईल असं अपेक्षित होतं पण नोव्हेंबर 2016 पर्यंतच अतिरिक्त 11 कोटी जमा झाले होते. तर २९ जानेवारीपर्यंत ५४ कोटी अतिरिक्त टोल जमा झाला आहे. हे असंच सुरु राहिले 2019 पर्यत 2000 कोटींपेक्षा अधिक वसूल केली जाईल अशी  भीती या अभ्यासकांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 06:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close