घसा बसला टीका करणाऱ्यांना उद्या जेलमध्ये बसावं लागेल -आशिष शेलार

 घसा बसला टीका करणाऱ्यांना उद्या जेलमध्ये बसावं लागेल -आशिष शेलार

  • Share this:

ASHISH_SHELAR_30 जानेवारी : मुख्यमंत्र्यांचा घसा बसला अशी टीका करणाऱ्यांना उद्या जेलमध्ये बसावं लागेल असा पलटवार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेनेवर केलाय. तसंच अहंकारीपणे वागणाऱ्यांना जनता धडा शिकवेल अशी टीकाही शेलार यांनी केली.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या कारभारावर सडकून टीका केली.  युती तुटली ती शिवसेनेमुळेच...शिवसेनेनं जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अपमानास्पद वागणूक दिली. विधानसभेत भाजप एक नंबर एकचा पक्ष झाला, नगरपरिषदा निवडणूक, कल्याण डोंबिवली पालिकेतही भाजपच्या जागा वाढल्यात त्यामुळे भाजपच नंबर एकचा आहे. पण आम्हाला 40 ते 45 जागांवर औकात काढली. त्यामुळेच आम्हाला त्यांची औकात काढण्याची भाषा वापरावी लागली असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

पारदर्शक आणि भ्रष्टाचारविरहीत मुद्यावर सेनेनं चर्चेला नकार दिला. मुळात शिवसेनेचं अहंकारी नेतृत्त्व आहे. त्यांचं कॅम्पेन हे त्याचं उदाहरण आहे. सत्तेत आमच्यासोबत बसायचं आणि वृत्तपत्रात टीका करायची हे योग्य नाही आमचा लढा कोणत्याही पक्षाशी नाही, आमचा लढा विचार आणि आचाराशी आहे असंही आशिष शेलार म्हणाले.

तसंच पप्पू कलानी यांना पक्षप्रवेश दिला असं नाही.  पप्पू कलानीच्या मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टीकरण देतील असं म्हणत आशिष शेलारांनी अंगही काढलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 30, 2017, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading