30 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर न करण्याची शक्यता सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. उमेदवारांची नावं जाहीर करण्यापेक्षा थेट एबी फाॅर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.पक्षात इतर इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करू नये म्हणून भाजप असा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळी निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक जागेसाठी अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळे तिकीटं न मिळालेले इच्छुक बंडखोरी करतील अशी शक्यता गृहीत धरुन हा निर्णय घेणार असल्याचं समजतंय. दरम्यान, आज रात्री मुख्यमंत्री फडणवीस गोव्याहून परतल्यानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते मंडळी यांची 'वर्षा' बंगल्यावर उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी बैठक होणार आहे. याच अजून काही वाॅर्डातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. काल झालेल्या बैठकीत काही वाॅर्डातील उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा