कुणाशीही युती करणार नाही, उद्धव ठाकरेंकडून 'टाळी' नाहीच !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

Uddhav raj new30 जानेवारी :  माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आलेला नाही. मी कुणाशीही युती करणार नाही असं स्पष्टीकरण देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेला टाळी देण्यास स्पष्ट नकार दिलाय. शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सेना-मनसेच्या युतीचा प्रस्ताव घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर 'मातोश्री'वर जाऊन आलेय.

बाळा नांदगावकर यांनी ‘मातोश्री’वर अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज ठाकरेंचा निरोप दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन कळवतो, असं शिवसेना नेत्यांनी बाळा नांदगावकरांना सांगितलं. आता या प्रस्तावाला आणि युतीच्या चर्चेला उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम लावलाय. शिवसेना स्वबळावरच लढणार आहे. माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आला नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता यावेळीही 'टाळी' वाजणार नाही आता हे स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...