News18 Lokmat

ज्यांनी हत्या केली, तेच लोक गांधीजींना पोस्टरवरून हटवत आहेत -राहुल गांधी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2017 04:13 PM IST

rahul gandhiaw30 जानेवारी : ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्या विचारधारेविरोधात आमची लढाई आहे. तेच लोक आज गांधींना पोस्टरवरूनही हटवत आहेत अशी जळजळीत टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता केली.

2014च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भिवंडी इथं सभेमध्ये भाषण करताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असल्याची टीका केली होती. त्यानंतर भिवंडीमधले संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर होते. कोर्टाने त्यांना आधीच जामीन मंजूर केला होता. आजच्या सुनावणीसाठी राहुल गांधी कोर्टात हजर होते. पुढची सुनावणी 3 मार्चला होणार आहे.

दरम्यान मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्या विचारधारेविरोधात आमची लढाई आहे. तेच लोक आज गांधींना पोस्टरवरूनही हटवत आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली. तसंच गांधीजींची हत्या केली जावू शकते,पण त्यांचे विचार नष्ट केले जावू शकत नाही असंही ते म्हणाले. गांधी हे भारतीयांच्या मनात आहेत त्यांना कोणीही हटवू शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...