ट्रम्पच्या मुस्लिमबंदी निर्णयानं मलाला दु:खी

ट्रम्पच्या मुस्लिमबंदी निर्णयानं मलाला दु:खी

  • Share this:

malala-yousafzai photos

30 जानेवारी : जागतिक शांतीसाठी नोबेल पुरस्कार मिळवलेली पाकिस्तानी समाजसुधारक मलाला युसुफजई ही डाॅनल्ड ट्रम्प यांच्या विधानावर दु:खी आहे. निर्वासितांबद्दल त्यांनी केलेलं विधान तिला आवडलं नसून ते चुकीचं आहे,असं ती म्हणते. जगातील सर्वात असुरक्षित आणि अस्थिर लोकांना आपण एकटं पडू देऊ नये, असं तिचं म्हणणं आहे.

पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या मलालाला 2012ला तालिबानींनी डोक्यात गोळी घातली होती. मलाल पुढे म्हणते की,'सतत हिंसा आणि युध्द चालू असलेल्या देशातील जीव वाचवून येणाऱ्या नागरिकांना ट्रम्प अमेरिकेचे दरवाजे बंद करताहेत याचं मला दु:ख वाटतंय.'

याबाबतच्या एका अध्यादेशावर डाॅनल्ड ट्रम्प यांनी नुकतीच स्वाक्षरी केली. त्यानंतर मलालाने हे विधान केलं. मलाला ही नोबेल पुरस्कार मिळवणारी सगळ्यात लहान व्यक्ती आहे. तिला भारतीय शैक्षणिक समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत 2014ला नोबेल मिळालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading