S M L

सुशांत सिंगनं केला 'राजपूत' आडनावाचा त्याग

Sonali Deshpande | Updated On: Jan 30, 2017 01:39 PM IST

सुशांत सिंगनं केला 'राजपूत' आडनावाचा त्याग

Sushant Singh Rajput

30 जानेवारी : संजय लीला भंसाळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सगळ्या बॉलिवूडने निषेध केला. अनुराग कश्यपने आपण राजपूत असल्याची लाज वाटतेय असं म्हटलं असताना सुशांत सिंगनेही याला दुजोरा दिलाय. सुशांत सिंगने ट्विटरवरून आपलं राजपूत नाव काढून टाकून या घटनेचा निषेध केला.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी चित्रपट 'पद्मावती'च्या सेटवर करणी सेनेने हल्ला केला.त्यात त्यांनी भंसाळी आणि 'पद्मावती'च्या टीमला मारहाण केली. मूळ कथेशी त्यांनी छेडछाड केल्याचा आरोप करणी सेनेने केला.


याचा निषेध म्हणून सुशांत सिंग राजपूतनं ट्विटरवरून आपलं आडनाव काढून टाकलं. ट्विटरवरील नाव हटवण्याविषयी विचारलं असता सुशांत सिंग म्हणाला की, 'राजपूत हे नाव लावणारे सगळेच असं वागत नाहीत. ते संपूर्ण राजपूत समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. प्रत्येकाला आपले विचार मांडायचे असतात, मात्र हिंसा हे त्यावरील उत्तर नाही. अशा लहान-लहान गोष्टीत तर अजिबात नाही. मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 09:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close