चंद्रपूर,गडचिरोलीमध्ये दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2017 01:18 PM IST

चंद्रपूर,गडचिरोलीमध्ये दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त

gad daru

30 जानेवारी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केलीय. जंगलात मोहफुलापासून गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्धवस्त केल्यात. तब्बल वीस लाखांपेक्षा जास्तीची दारू जप्त करण्यात आलीय.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासह निवडणुकीच्या दिवसापर्यंत होणारा दारूचा वापर पाहता दारू विक्रेत्यांनी जंगलात हातभट्ट्या उभारल्या होत्या.गडचिरोली पोलिसांनी आष्टीजवळच्या राममोहनपूरच्या जंगलात तब्बल पन्नास ड्रममध्ये असलेली दारू जप्त करून हातभट्टी उद्धवस्त करण्यात आलीय.

दुसरीकडे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही घंटाचौकी जंगलातले नऊ हातभट्टीचे अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केलेत. या अड्ड्यांवरील सहाशे लीटर गावठी दारूसह सहा हजार लीटर मोहफुलाचा सडवा असा दहा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...