फ्रान्सची आयरिस मिटेनेर मिस युनिवर्स

फ्रान्सची आयरिस मिटेनेर मिस युनिवर्स

  • Share this:

miss-universe-featured01

30 जानेवारी : मिस युनिवर्स हा किताब यंदा फ्रान्सच्या आयरिस मिटेनेरनं पटकावला.फर्स्ट रनरअप हैतीची मिस पेलिसिसर राहिली तर सेकंड रनरअपचं स्थान मिस टोवरला मिळालं.

24 वर्षाची मिटेनेर मूळची पार्सियन आहे. सध्या ती डेंटल सर्जरीच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. तिची योजना आहे की, मिस युनिवर्स या प्लॅटफॉर्म वापरून ती डेंटल आणि ओरल हायजीनचं महत्त्व पटवून देण्याचं काम करेल.

प्रश्न-उत्तरांच्या फेरीदरम्यान, मिटेनेरने फ्रान्समधील ओपन बॉर्डर आणि शरणार्थी लोकांची बाजू घेतली. तसंच आपल्या देशाचं कौतुक केलं. मिटेनेर म्हणाली, 'फ्रान्समधील आम्हा लोकांना वाटतं की, जितकं आपल्याला जास्त ग्लोबल बनता येईल तेवढं बनलं पाहिजे. मला आणि माझ्या देशाला वाटतं की, जास्तीत जास्त लोकांना आम्ही आसरा देऊ.'

या स्पर्धेत प्रमुख 13 फायनलिस्टमध्ये केनिया, इंडोनेशिया, मेक्सिको, पेरू, पनामा, कोलंबिया, फिलीपाईन्स, कॅनडा, ब्राझील, हैती, थायलंड आणि युएसए यांचा समावेश होता. परीक्षकांच्या पॅनलवर भारताची सुश्मिता सेनही होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 30, 2017, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading