S M L

लालबाग फ्लायओव्हरला भेग पडल्याने वाहतूक बंद

Samruddha Bhambure | Updated On: Jan 30, 2017 11:03 AM IST

लालबाग फ्लायओव्हरला भेग पडल्याने वाहतूक बंद

30 जानेवारी : दक्षिण मध्य मुंबईतला लागबाग फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला मोठी भेग पडल्याने इथली वाहतूक आज (सोमवारी) बंद करण्यात आली आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास भेग पडल्याचे लक्षात आल्यानंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत, हा पाहणी करून फ्लायओव्हरवरची दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली आहे.

सर्व वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली आहे. परंतु अचानक झालेल्या या बदलामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे.


यापूर्वीही लालबागचा हा फ्लायओव्हर भेगांमुळेच बंद करण्यात आला होता. आज पुन्हा या फ्लायओव्हरवरील वाहतूक रोखण्यात आली होती. सतत पडणाऱ्या भेगांमध्ये रस्ता दुभागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक बनत आहे.

2011 मध्ये हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तसंच काही महिन्यांआधीच या रस्त्यातील खड्डेही बुजवण्यात आले होते. त्यामुळे दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 11:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close