बिग बाॅसचा विजेता आम आदमी मनवीर गुर्जर

बिग बाॅसचा विजेता आम आदमी मनवीर गुर्जर

  • Share this:

big boss manveer gurjar

30 जानेवारी : लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये मनवीर गुर्जर हा 'आम आदमी' जिंकला. बानी जे. आणि लोपामुद्रा राऊत या दोघींना मात देत तो विजेता ठरला. बानी आणि लोपामुद्रा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. बिग बॉसच्या घरातला मनवीरचा चांगला मित्र असलेला मनु पंजाबी टॉप फोरमध्ये होता. मात्र बिग बॉसकडून दिलेले १० लाख रुपये घेऊन तो घराबाहेर पडला.

या शोचा विजेता म्हणून घोषित झाल्यानंतर मनवीर म्हणाला ,'मी खूप आनंदी आहे. मी हा प्रवास अक्षरश: जगलो. आपल्या पध्दतीने लढलो आणि जिंकलो. मला वाटतं मी सगळं मनापासून केलं आणि प्रामाणिक राहिल्याचा हा परिणाम आहे. ' यासोबतच त्याला बक्षिस म्हणून ४० लाख रुपये मिळाले. पैकी अर्धी रक्कम आपण बीईंग ह्युमन देणार असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

सामान्य नागरिक म्हणून सामील होत असताना मनवीरने अनेक लोकप्रिय आणि प्रसिध्द व्यक्तींसोबत कडवी लढत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 09:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading