आज घसा बसला उद्या घरी बसाल, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2017 11:47 AM IST

uddhav_on_cm

30 जानेवारी :  'शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पेटलेला अंगार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या आगीशी खेळू नये. पचेल तेच बोलावे. अन्यथा आज घसा बसलाय, उद्या कायमचेच घरी बसाल,' अशी तोफ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागली आहे.

शिवसेना आणि भाजपमधील संबंध विकोपाला गेले आहेत. मुंबईतील सभांमध्ये औकात दाखवण्यापासून पाणी पाजण्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. २५ वर्ष भाजपसोबत सडलो, यापुढे कुठेही युती नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर भाजप मेळाव्यात शिवसेनेला जागा दाखवून देण्याचे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यानंतर शिवसेनेही मुख्यमंत्र्यांविरोधात टीका केली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा सामनातून खरपूस समाचार घेतला आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना-भाजपा परस्परांवर चिखलफेक करत उणीदुणी काढत आहेत. अयोध्येतील राममंदिराची घोषणा हे लोक 28 वर्ष करत आहेत. केंद्रात सत्ता आल्यापासून अयोध्येत राम मंदिर बनेल, असं भाजपाला वाटतं. कदाचित हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील. समान नागरी कायद्याच्या बाबतीत गंडवागंडवी सुरूच आहे. मुंबईसह महाराष्ट्र यांना धनदांडग्याच्या घशात घालायचाच आहे, अशी टीकेची झोड शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर करण्यात आली आहे.

तसंच, अधूनमधून हळद टाकून गरम दूध प्यावं. त्यामुळे घशाला शेक बसून थोडा आराम पडेल. गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून प्राशन केल्यासही  घशाला आराम पडू शकतो, असा उपरोधिक सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घशासाठी रामदेवबाबाचे प्रॉडक्ट पंतजली वापरण्याची सुचनाही दिली आहे.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी जे पचेल तेच बोलावे, शिवसेनेचे काम हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला कलानी – भोसल्यांसारख्या गुंडापुंडांची, खंडणीखोरांची कवचकुंडले लागत नाहीत. ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष टीव्ही कॅमेऱ्यांसमोर खंडणी घेताना पकडला गेला, त्या पक्षाच्या लोकांनी शिवसेनेवर हे असले घाणेरडे आरोप करावेत हा विनोदच आहे.

शिवसेना म्हणजे महाराष्ट्र अस्मितेचा पेटलेला अंगार आहे. आगीशी खेळू नका ! अशा इशाराही सेनेने भाजपला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...