S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

गुरुजींची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

Sonali Deshpande | Updated On: Jan 29, 2017 08:13 PM IST

गुरुजींची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

balasaheb

29 जानेवारी : पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यातील के.एल.पोंदा हायस्कूलच्या इंग्रजी विषयाचे शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालीये. त्यांनी अथक परिश्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सरळ आणि सोप्यारितीने समजावी यासाठी त्यांनी साध्या शब्दांची बॅंक तयार केलीये. या बँकेतील १७० इंग्रजी शब्द वापरून तब्बल पन्नास लाख इंग्रजी वाक्ये तयार करण्याचा विक्रम यांनी केलाय.

चव्हाण यांच्या या अनोख्या संशोधन पद्धतीमुळे के.एल. पोंदा हायस्कूलमधील मुलांना फारच फायदा झालाय. इंग्रजीबद्दल नेहमी मनावर असणारं दडपण आता एकमेकांशी बोलताना वाटत नाही. या सोप्या पध्दतीने एका शब्दातून अनेक वाक्य सोप्या आणि साध्या पध्दतीने निघत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातली इंग्रजी विषयाची भीती कमी झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close