कहाणी समर्पित आयुष्याची...

कहाणी समर्पित आयुष्याची...

29 मेप्राध्यापक. ग. प्र. प्रधान यांचा जन्म 26 ऑगस्ट 1921 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर वाचनाचे संस्कार झाले. वाचनातून त्यांचे आयुष्य घडत गेले. त्यांच्या वाचनात पंडित नेहरूंचे पुस्तक आले. त्यातून त्यांना स्वातंत्र्य चळवळीची ओळख झाली. 1935 मध्ये ते पुण्यात राहायला आले. त्यावेळी पंडित नेहरूंचे भाषण ऐकून ग. प्र. यांनी स्वातंत्र्य चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये शिकत असताना मधू लिमये, अरविंद टिपणीस या मित्रांमुळे ते विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. त्यानंतर ते साने गुरूजींशी संपर्कात आले. साने गुरूजींच्या सांगण्यावरून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी घेण्याची प्रतिज्ञा केली. एस. एम.जोशींनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केल्यावर प्रधान सरांनी त्यांच्या आंदोलनात भाग घेतला. 1942 च्या चळवळीत तर घर सोडून त्यांनी आंदोलनात उडी घेतली. त्याच वेळी ते गांधीजींच्या संपर्कात आले. त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र समाजवादी पक्षाचे काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून राजकारणात पदार्पण केले. 1966 मध्ये त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि निवडूनही आले. 1980 ते 82 मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. आणिबाणीत त्यांनी तब्बल 18 महिने कारावास सोसला. पण 1984 मध्ये पुन्हा 'साधना'त काम करण्यासाठी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. आणि लेखन सुरू केले. प्रधान सर 'साधना'चे संपादकही झाले. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकीय चळवळींवर त्यांनी 'साठा उत्तराची कहाणी' हे पुस्तक लिहीले. यात चळवळीतील कार्यकर्त्यांचे आयुष्य आणि महाराष्ट्राचा या काळातील राजकीय इतिहास प्रधानमास्तरांनी वेगळ्या पद्धतीने लिहिल्यामुळे हे पुस्तक प्रचंड गाजले. 'भाकरीआणि स्वातंत्र्य' हे त्यांचे वैचारिक लेखांचे पुस्तक आजही अनेक विद्यापीठांमधून समाजवादाचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी संदर्भ म्हणून वापरले जाते. त्यानंतर 'साठा उत्तराची कहाणी', 'डॉ. आंबेडकरांचं चरित्र', टॉलस्टॉयवरील पुस्तकाचा अनुवाद अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. समाजसेवेचे व्रत अंगात भिनलेल्या प्रधान सरांनी स्वतःचे राहाते घरही साधना मासिकाच्या कार्यालयाला दिले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. गेली अनेक वर्ष ते फक्त एक वेळचे जेवण घेत होते. पण गेल्या काही दिवसांत त्यांनी जेवण पूर्णपणे सोडून दिले होते. आज पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसेवकाला महाराष्ट्र मुकला आहे.

  • Share this:

29 मे

प्राध्यापक. ग. प्र. प्रधान यांचा जन्म 26 ऑगस्ट 1921 मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर वाचनाचे संस्कार झाले. वाचनातून त्यांचे आयुष्य घडत गेले.

त्यांच्या वाचनात पंडित नेहरूंचे पुस्तक आले. त्यातून त्यांना स्वातंत्र्य चळवळीची ओळख झाली. 1935 मध्ये ते पुण्यात राहायला आले. त्यावेळी पंडित नेहरूंचे भाषण ऐकून ग. प्र. यांनी स्वातंत्र्य चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला.

कॉलेजमध्ये शिकत असताना मधू लिमये, अरविंद टिपणीस या मित्रांमुळे ते विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. त्यानंतर ते साने गुरूजींशी संपर्कात आले. साने गुरूजींच्या सांगण्यावरून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी घेण्याची प्रतिज्ञा केली.

एस. एम.जोशींनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केल्यावर प्रधान सरांनी त्यांच्या आंदोलनात भाग घेतला. 1

942 च्या चळवळीत तर घर सोडून त्यांनी आंदोलनात उडी घेतली. त्याच वेळी ते गांधीजींच्या संपर्कात आले. त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र समाजवादी पक्षाचे काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून राजकारणात पदार्पण केले. 1

966 मध्ये त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि निवडूनही आले. 1980 ते 82 मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. आणिबाणीत त्यांनी तब्बल 18 महिने कारावास सोसला.

पण 1984 मध्ये पुन्हा 'साधना'त काम करण्यासाठी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. आणि लेखन सुरू केले. प्रधान सर 'साधना'चे संपादकही झाले.

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकीय चळवळींवर त्यांनी 'साठा उत्तराची कहाणी' हे पुस्तक लिहीले. यात चळवळीतील कार्यकर्त्यांचे आयुष्य आणि महाराष्ट्राचा या काळातील राजकीय इतिहास प्रधानमास्तरांनी वेगळ्या पद्धतीने लिहिल्यामुळे हे पुस्तक प्रचंड गाजले.

'भाकरीआणि स्वातंत्र्य' हे त्यांचे वैचारिक लेखांचे पुस्तक आजही अनेक विद्यापीठांमधून समाजवादाचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी संदर्भ म्हणून वापरले जाते. त्यानंतर 'साठा उत्तराची कहाणी', 'डॉ. आंबेडकरांचं चरित्र', टॉलस्टॉयवरील पुस्तकाचा अनुवाद अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

समाजसेवेचे व्रत अंगात भिनलेल्या प्रधान सरांनी स्वतःचे राहाते घरही साधना मासिकाच्या कार्यालयाला दिले.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. गेली अनेक वर्ष ते फक्त एक वेळचे जेवण घेत होते. पण गेल्या काही दिवसांत त्यांनी जेवण पूर्णपणे सोडून दिले होते.

आज पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसेवकाला महाराष्ट्र मुकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2010 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading