S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

भाजप खासदार नाना पटोलेंना अर्धांगवायूचा झटका

Samruddha Bhambure | Updated On: Jan 29, 2017 05:47 PM IST

भाजप खासदार नाना पटोलेंना अर्धांगवायूचा झटका

29 जानेवारी :  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नाना पटोले यांना आज एका कार्यक्रमादरम्यान अर्धांगवायूचा झटका आला. सध्या त्यांना नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

नाना पटोले आज (रविवारी) सकाळी शिवणीबांध इथे विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करायला गेले होते. त्यावेळी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रूग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सध्या नाना पटोलेंवर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं कळत आहे. सध्या त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील कुंडे आणि भाजपचे डॉ. परिणय फुके आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close