स्वतःला कृष्ण म्हणवून कोण कृष्ण बनत नाही - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jan 29, 2017 05:49 PM IST

Uddhav thackraydlhajhsd

29 जानेवारी : जसं लाल किल्ल्यावर भाषण केल्यावर पंतप्रधान होत नाही, तसं स्वतःला कृष्ण म्हणवून कोण कृष्ण बनत नाही, स्वतःला पांडव म्हटल्यानं कोणी पांडव होत नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, उद्धव यांची दुर्योधनाशी तर भाजपची पांडवांशी अप्रत्यक्ष तुलना केली होती. हा प्रकार बघून कोकणातला दशावतार सुरु असावं असं वाटतं असल्याचं उद्धव म्हणाले.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या भाजप मेळाव्यात शिवसेनेवर केलेल्या घणाघाती टीकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र उद्धव यांनी फार बोलणार नाही, नाहीतर घसा बसेल, अशा शब्दात फडणवीसांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर काहीही बोलायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. भाजपला काय टीका करायची ती करु द्या, आपण आपलं काम घेऊन लोकांपुढे जाऊ, असं कार्यकर्त्यांना सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही आमची मुंबई घडवल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती, मात्र ती आता मलिन झाली आहे. आता ते गुंडाचे मंत्री आहेत का असा प्रश्न पडतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  मी मांडलेल्या पारदर्शकतेच्या मुद्यावर कोणीच बोलत नाही, आता अच्छे दिनबद्दल कोणी का बोलत नाही, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

भाजपला वाटतं केंद्रात सरकार आलं म्हणून ते राम मंदिर बांधतील. त्यावेळी हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील, त्यामुळे राम मंदिर बांधायला सुरुवात होईल, असा घणाघातही उद्धव यांनी केला. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत आणि त्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत, असं सांगताना आपण मुंबई-ठाणेकरांना दिलेलं वचन पाळणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close