आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया पराभूत

आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया पराभूत

  • Share this:

sania-mirza-dodig2_2901getty_875

29 जानेवारी : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या इव्हान डॉडिगसोबत पराभवाचा सामना करावा लागला. कोलंबियाच्या ज्युआॅन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या जोडीने सानिया - डॉडिग या जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समांथा स्टोसुर आणि सॅम ग्रोथ जोडीवर ६-४, २-६, १०-५ असा विजय मिळवत सानिया-डॉडिग ही जोडी फायनलमध्ये पोहोचली होती. पण कोलंबियाच्या ज्युआॅन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या नवीन जोडीने सानिया - डॉडिग या जोडीचा पराभव केल्याने सर्वच जण आश्चर्यचकित झाले.

सानिया मिर्झाच्या नावे सिक्स ग्रँड स्लॅम्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading