मुंबईत कॉंग्रेसला आणखी एक धक्का, आंबेरकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत कॉंग्रेसला आणखी एक धक्का, आंबेरकरांचा शिवसेनेत प्रवेश

  • Share this:

bajdnsajfday

29 जानेवारी :  मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपसोबतची युती तोडल्यावर आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यावर शिवसेनेतही मोठं इनकमिंग सुरू झालं आहे. दुसऱ्या पक्षातील अनेक मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर पक्ष प्रवेश करत आहेत. त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

युती तुटल्यानंतर मुंबईतील पूर्ण 227 जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांना आता संधी मिळत आहे. त्याचाच परीणाम म्हणजे आता थेट माजी विरोधी पक्ष नेताच शिवसेनेत प्रवेश करत आहे.

देवेंद्र आंबेरकर यांचा शिवसेनेतला प्रवेश म्हणजे काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

काँगेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. कामत यांनी दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांच्या मनमानी कारभारावर जाहीरपणे टीका केली होती.

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांशी देखील बोलणार आहेत. कालच भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. या टिकेवर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 01:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading