संपत्तीच्या वादातून पाटबंधारे विभागाच्या शिपायाला जिवंत जाळलं

संपत्तीच्या वादातून पाटबंधारे विभागाच्या शिपायाला जिवंत जाळलं

  • Share this:

Dhule man burned

29 जानेवारी :  धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात पाटबंधारे विभागाच्या शिपायाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गोकुळ रतन माळी यांना प्रॉपर्टीच्या वादातून त्याच्याच कार्यालयासमोर सॅन्ट्रो कारमध्ये तोंडात बोळा कोंबून, सीटला हातपाय बांधून जिवंत जाळलं आहे.

साक्री शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाहेर काल रात्री 11 ते 12.30 च्या दरम्यान ही घटना आहे.

दरम्यान,  याप्रकरणी  गोकुळ माळी यांच्या सख्या चुलत भावासह चार जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या साक्री पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

या घटनेने साक्रीत शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 10:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...