अहमदनगरमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी फरार

अहमदनगरमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी फरार

  • Share this:

 

child-abuse-minor-rape_5a474180-748c-11e5-984c-f6a239d2879e

29 जानेवारी :  अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरुच आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडीमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

16 वर्षांच्या मुलानं चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. जामखेड पोलिस स्थानकात अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी 25 जानेवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पीडित चिमुरडी घराजवळ खेळताना त्याने स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.  मुलगी खूप वेळापासून दिसत नसल्यानं आईनं पिडीतेला शोधत होती. त्यावेळी आरोपी मुलीवर अत्याचार करताना आईला आढळून आला.

दरम्यान, शनिवारी आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 09:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading