भाजपातील सुप्त संघर्षाचा फायदा शिवसेनेला घेता येईल का?

भाजपातील सुप्त संघर्षाचा फायदा शिवसेनेला घेता येईल का?

  • Share this:

uddhav_on_cmप्रफुल्ल साळुंखे, मुंबई

28 जानेवारी : शिवसेना भाजप युती बद्दल सर्व शक्यता शिवसेना मेळाव्यात संपुष्टात आल्या. शिवसेना युती होणार की नाही ? शिवसेना शी युती तोडायची असेल तर ती घोषणा कोण करेल यात भाजप मध्ये अस्वस्थता होती. " मी अर्जुन आहे माझा कृष्ण म्हणजे देवेंद्र, देवेंद्र ने सांगतील ते मी कारेन" अस सांगत भाजपच्या मेळाव्यात या संपूर्ण प्रक्रियेपासून भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वतःला सावध केलं. युतीची संपूर्ण जबादारी मुख्यमंत्री यांच्या खांद्यावर टाकली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस याना मुंबई महापालिका तर हवी होतीच पण मुख्यमंत्री पदाची चिंताही होतीच.

मुख्यमंत्री ना कुठल्याही परिस्थितीत आक्रमक विरोधी पक्ष नेता नको आहे. खुर्ची सुरळीत असताना शिवसेना सारखा आक्रमक विरोधक राज्यात नको हा सेफ गेम मुख्यामंत्र्यांना खुणावत होता. युती नकोच ही भूमिका दिल्लीत पटवून देण्यात पक्षातील विरोधक यशस्वी झाले. गेले अडीच वर्षे मुख्यमंत्री नी पक्षबाहेर आणि पक्षातील विरोधकांना डोईजड होऊ दिल नाही. अशा परिस्थितीत मुंबई डोईजड होणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्री घेताना दिसतंय.म्हणूनच कि काय प्रवीण दरेकर, प्रसाद लाड याना भाजपमध्ये प्रवेश देत मुख्यमंत्री नी स्वतःची यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न सुरु केली.  हीच बाब मुंबई भाजपात असंतोष निर्माण करणारी ठरलीय.

भाजपच्या प्रचारावर संपूर्ण पणे मुख्यमंत्री यांची छाप आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचाराचे केंद्र बिंदू आहेत. दादर कार्यालयाच्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांचं वक्तव्य बोलकं होत " जिकल्याच श्रेय मुख्यमंत्र्यांना आहे, पराभवच श्रेय माझं " दिल्लीत दबदबा बनवण्यासाठी मुंबईची निवडणूक स्रेयाची लढाई बनली हे नक्कीच.

युती ची चर्चा करताना  मुंबईत आशिष शेलार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, यांच्या खांद्यावर जबादारी होती. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं या तिन्ही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मुख्यमंत्री दिल्लीहुन परतल्यानंतर युती होणार नाही हे स्पष्ट झालं. अशा परिस्थितीत युती तुटल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित होती. पण चक्र का कशी फिरली की युती तुटण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभेत युती तोडण्याची घोषणा कोण करणार ? याबाबत शिवसेनेनं मौन बाळगलं.

शेवटी युती तुटण्याची घोषणा खडसेंनी केली. अशा परिस्थितीत महापालिकेतली युती तोडण्याची घोषणा शिवसेनेच्या पक्षप्रमुखनी का घेतली? हे न समजण्यासारखं आहे. युती तुटल्यानंतर मुख्यामंत्री समर्थकाकडून फिरणारे संदेश बोलके होते " मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही होते. पण मुंबईच्या नेत्यांनी बोलणी सुरू असताना युतीचं वातावरण कलुषित केलं" हा संदेश भाजपात पडद्याआड काय सुरू आहे हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 28, 2017, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading