शिवसेना-मनसेची छुपी युती तर नाही ना? -आशिष शेलार

शिवसेना-मनसेची छुपी युती तर नाही ना? -आशिष शेलार

  • Share this:

ashish_shelar28 जानेवारी :  दादरच्या एका नेत्याचा शिवस्मारकालाही विरोध, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकालाही विरोध आहे. आणि सेनेच्या वचननाम्यातही सेनेला विसर पडलाय. त्यामुळे छुपी युती करण्यासाठी हा विसर पडलाय का ? अशी शंकाच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्याच व्यासपीठावर बोलून दाखवली. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना दुर्योधन आणि सेनेला माजलेल्या रावणाची उपमाच देऊन टाकली.

भाजपच्या मेळाव्यात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.  युती तुटली त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वांना पडलाय. ज्या प्रकारे कृष्णाने महाभारताचं युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला.पण दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत घडलं आमची युतीही अहंकारामुळे तुटली असा आरोप करत शेलारांनी उद्धव ठाकरे यांना दुर्योधनची उपमा दिली.

तसंच शिवसेना कौरव तर आम्ही पांडव आहोत. कृष्णांची कृष्णशिष्टाई असफल झाली कृष्ण म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण शिवसेना नेतृत्वाचा अहंकार आडवा आलाय. शिवसेनेच्या नेत्यांची भाषाही  माजलेल्या रावणाप्रमाणे होती अशी टीकाही शेलार यांनी केली. युतीची वर्ष सुगंधी होती पण ज्यांना दुर्गंधी अधिक प्रिय ते युतीला सडकी म्हणत आहेत असा टोलाही शेलारांनी लगावला.

अहंकारी उद्धव ठाकरे म्हणतात सर्व काही मीच करून दाखवलं.  पण बाळासाहेबांचं स्मारक यांनी काही करुन दाखवलं नाही.  नितिन गडकरी यांनी मुंबईत 55 पुल बांधले. वांद्रे-वरळी सी लिंक ची कल्पना देखील गडकरी यांचीच आहे. दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवला असा दाखलाच शेलार यांनी दिला.

उलट आम्हालाच विचारात मुंबईशी आमचं नात काय ?, आमचं नातं फक्त विकासाच आहे. आम्ही काही पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेसारखे खून पाडले नाहीत असा आरोपही शेलार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 09:23 PM IST

ताज्या बातम्या