मुंबई महापालिका भाजपच्या प्रचारात 'ओन्ली मुख्यमंत्री'

मुंबई महापालिका भाजपच्या प्रचारात 'ओन्ली मुख्यमंत्री'

  • Share this:

 only_cm28 जानेवारी : युती तुटल्यानंतर भाजप आता स्वबळावर मैदानात उतरणार आहे. आणि याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली त्याचं बोलकं दृश्य आजच्या मेळाव्यात पाहण्यास मिळालं. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो पोस्टरवर आहे.

गिरगावमध्ये आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलंय. या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतांना पंतप्रधानांचा फोटो आहे आणि दुसरा फोटो फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. यावरुन राज्याच्या भाजपमध्ये फक्त फडणवीस हे अधोरेखित झालंय. भाजपच्या प्रचारावर संपूर्णपणे मुख्यमंत्री यांची छाप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचाराचे केंद्र बिंदू आहेत.

दादर कार्यालयाच्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांचं वक्तव्य बोलकं होत " जिकल्याच श्रेय मुख्यमंत्रीना आहे, पराभवच श्रेय माझं " दिल्लीत दबदबा बनवण्यासाठी मुंबईची निवडणूक श्रेयाची लढाई बनली हे नक्कीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 07:01 PM IST

ताज्या बातम्या