हा भारतच आहे का?, भन्साळींच्या मारहाणीवर बाॅलिवडूकर संतापले

हा भारतच आहे का?, भन्साळींच्या मारहाणीवर बाॅलिवडूकर संतापले

  • Share this:

bhansali_marhan28 जानेवारी : संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावती'च्या सेटवर करणी सेनेने केलेल्या मारहाणीचा बॉलिवूडने निषेध केलाय. सर्वांनी भंसाळींची पाठराखण केली असून करणी सेनेचा निषेध केला आहे. यात करण जोहर, अनुराग कश्यप, राम गोपाल वर्मा, सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे. राणी पद्मावती यांच्या कथेसोबत छेडछाड केल्याचा आरोप या सेनेने भंसाळी आणि टीमवर केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडकरांनी आपला राग व्यक्त केलाय.

आपला राग व्यक्त करताना करण जोहर म्हणाला की, 'आपल्याला संजय लीला भंसाळींसोबत घडलेल्या प्रकाराचा निषेध करायला हवा. आपल्याला भंसाळी आणि टीमसोबत उभं राह्यला हवं. हे घडायला नको होतं. मला असहाय्य वाटतंय आणि राग येतोय. '

अनुराग कश्यपने ट्विट केलं की, 'आपल्या इंडस्ट्रीने एकत्र येऊन याबाबत काहीतरी करायला हवं. करणी सेनेला लाज वाटायला हवी. तुमच्यामुळे मला राजपूत असल्याची लाज वाटतेय. तुम्ही भित्रे आहात. हिंदू दहशतवाद्यांनी आपलं अस्तित्व दाखवलंय. हिंदू अतिरेकी ही यापुढे दंतकथा नसेल.'

राम गोपाल वर्मा या चित्रपट निर्मात्यानेही आपला संताप व्यक्त केलाय, 'हा भारतच आहे का? करणी सेनेला लाथांनी तुडवलं पाहिजे. खिलजी किंवा पद्मावतींविषयी भंसाळींना जेवढा माहित असेल त्याच्या एक टक्काही त्यांना माहीत नसेल. जर कलाकारांचं रक्षण करता येत नसेल तर आपण देश म्हणवून घेऊ नये. सेन्सॉर बोर्डसोबत असलेला निर्मात्यांचा वाद हा विनोदी भाग आहेच मात्र हा घटनेवरून असं दिसतंय कि आजकाल कुणाही सेन्सॉर बोर्ड होऊ शकतं.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 28, 2017, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading