Elec-widget

जडेजाच्या कारची दुचाकीला धडक, तरुणी किरकोळ जखमी

जडेजाच्या कारची दुचाकीला धडक, तरुणी किरकोळ जखमी

  • Share this:

ravindra_jadeja_Car28 जानेवारी : भारतीय गोलंदाज रविंद्र जडेजाच्या कारने एका स्कूटरला धडक दिली असून त्यात एक मुलगी जखमी झालीये. या घटनेनंतर स्वत: जडेजा त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेला. काही प्राथमिक उपचारानंतर त्या मुलीला सोडून देण्यात आले.

जडेजा आपल्या पत्नीसोबत ऑडी कारने जात असताना घराजवळच टु -व्हिलरवरून जाणाऱ्या मुलीला ठोकर दिली. त्यावेळी ती संतूलन गमावून रस्त्यावर पडली. तिला लगेच जडेजा आणि त्याच्या पत्नीने उठवून रस्त्याच्याकडेला बसवलं. तिला दवाखान्यात भरती केलं. डॉक्टर म्हणाले की,'मुलीच्या पायाला आणि हाताला किरकोळ जखमा आहेत. मलमपट्टी करून तिला सोडण्यात आलं.. दरम्यान तिथे उपस्थित लोकांनी सांगितलं की जडेजाच्या कारच्या मागच्या बाजूने त्या मुलीच्या स्कुटरला धडक दिली.

या घटनेत जखमी झालेल्या मुलीचं नाव प्रीति शर्मा आहे आणि ती जामनगर येथे राहते आणि शिकते.

रविंद्र जडेजाची ही ऑडी क्यू-745त्याला त्याच्या सासरहून मिळाली होती. इतकी महागडी गाडी गिफ्ट म्हणून मिळाल्यानंतर जडेजा गंमतीने म्हणाला होता की असे सासरे सर्वांना मिळायला हवेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...