S M L

सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2017 06:04 PM IST

सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

28 जानेवारी : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या विल्यम्स बहिणींमधला ऑस्ट्रेलिअन ओपन २०१७ चा सामना मेलबर्न येथे पार पडला. यात सेरेनाने आपली बहीण व्हीनस हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला.

एक तास बावीस मिनिटांच्या या सामन्यात सेरेनाने आपलं सातवं ऑस्ट्रेलिअन ओपन चषक जिंकलं. याच विजयासोबत तिने स्टेफी ग्राफच्या बावीस ग्रॅन्ड स्लॅमचा रेकॉर्ड मोडला. तसंच तिने आपलं जागतिक टेनिसमधील अव्वल स्थान पुन्हा मिळवलंय. सर्वाधिक म्हणजेच २५ ग्रॅन्ड स्लॅमसाठी तिला अजून दोन टायटलची गरज आहे. हा तिचा तेवीसावा ग्रॅन्ड स्लॅम आहे. तिची बहीण व्हीनस हिच्याविरुद्धच ही अंतिम लढत असल्याने हा सामना दोघींसाठी खूप महत्त्वाचा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 06:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close