दीपिका म्हणते, 'प्रियांका आणि माझी तुलना करू नका'

दीपिका म्हणते, 'प्रियांका आणि माझी तुलना करू नका'

  • Share this:

deepika_and_priyanka28 जानेवारी : बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची नेहमीच तुलना केली जाते. सतत केल्या जाणाऱ्या तुलनेबाबत दीपिका म्हणते की, आमच्या दोघींमध्ये तुलना करायची काहीच आवशक्यता नाहीय. कारण आमच्या दोघींच जग आणि आमचा यशाचा मार्ग फार निराळा आहे. आणि आम्ही दोघीही वेगवेगळ्या यशाच्या शिखरावर पोहचण्याचा प्रयत्न करतोय.

हॉलिवूड वेबसिरिज 'क्वांटिको' च्या यशानंतर प्रियांका आता 'बेवॉच' या हॉलिवूड सिनेमाच्या तयारीला लागलीय. या सिनेमामध्ये अभिनेता ड्वेन जॉनसनसुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहे.

'ट्रिपल एक्स: द जेंडर केज' या हॉलिवूड सिनेमासाठी आणि त्यात साकारलेल्या भूमिकेबाबत मला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी फारच भारावून गेलीय असं मत दीपिकाने व्यक्त केलंय. सध्या दीपिका संजय लीला भंसाली यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. तसेच शाहिद कपूर आणि रणवीर सिंह सुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 05:58 PM IST

ताज्या बातम्या