बाहुबलीचं पहिलं पोस्टर पाहिलं का ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2017 05:50 PM IST

बाहुबलीचं पहिलं पोस्टर पाहिलं का ?

bahubali28 जानेवारी : दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी आपल्या बाहुबली चित्रपटाचं पहिलं पोस्टर ट्विट केलं. या आकर्षक पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी दिसून येत आहेत.

ब्लॉकबस्टर बाहुबली या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. यावर्षी एप्रिल महिन्यादरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने संपूर्ण जगाला एका कोड्यात टाकलं होतं ते म्हणजे 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं ?'. लवकरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल ,असं दिसतंय.

सोशल मीडियात या पोस्टरची खुप 'चर्चा' आहे. या दुसऱ्या भागात पहिल्या चित्रपटाचे खूप संदर्भ असणार हे नक्की. हा चित्रपट तमिळ, मल्याळम्, तेलूगु आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. चित्रपटात तमन्ना भाटीया आणि राणा दुगुबट्टीसुध्दा दिसणार आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी हे पोस्टर रिट्विट केलंय आणि चित्रपटाला आपल्या शुभेच्छा दिल्यात.bahubali 2 poster

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...