प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ तिसरा

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ तिसरा

  • Share this:

C3ErFDFUMAAxCZj28 जानेवारी : दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळालाय. अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावलाय.

यंदा 26 जानेवारीच्या राजपथावर झालेल्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा लोकमान्य टिळकांच्या 160व्या जयंती वर्षानिमित्त टिळकांनी सुरू केलेल्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक जनजागृतीचा देखावा चित्ररथातून मांडण्यात आला होता. टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव, शिवउत्सव, मल्लखांब, केसरी पेपरची छपाई, मंडाले तुरुंगवास, त्यांच्यावर लावलेला देशद्रोहाचा खटला हे सगळं चित्ररथातून मांडलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 28, 2017, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading