युती तोडण्याची पद्धत आणि भाषा चुकीची-गडकरी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

युती तोडण्याची पद्धत आणि भाषा चुकीची-गडकरी

gadkari_on_uddhav28 जानेवारी : शिवसेनेनं युती तोडली ती योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही, असं मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं.तसंच युती केली नसती तर सेनेचा मुख्यमंत्रीही झाला नसता अशी आठवणही गडकरींनी करून दिली. गोव्यात प्रचार करताना ते पत्रकारांशी बोलत होते.

गेली 25 वर्ष युती सडली असा घणाघात करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या आक्रमकतेमुळे भाजपच्या गोटात चिंतातूर वातावरण आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी युती तोडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीये. 25 वर्षांमध्ये युती सडली हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य दुर्दैवी आहे असं मत गडकरींनी व्यक्त केलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांना आम्ही मानतो. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलंय. युतीचा फायदा दोन्ही पक्षाला झालाय. जर भाजप शिवसेना युती नसती तर शिवसेनेचा पण मुख्यमंत्री झाला नसता अशी आठवणही गडकरींनी करुन दिली.

तसंच त्यावेळी प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांमध्ये ठरलं होतं. जर युती तोडण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली असती तर दोन्ही नेते एकत्र बसणार, चहापानावर चर्चा करणार आणि युती तोडण्याचा निर्णय घेणार असं ठरलं होतं पण आता तसं काही घडलं नाही असंही गडकरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...