माणुसकी मेली !, 'त्या'ने माकडांना ठार मारलं

माणुसकी मेली !, 'त्या'ने माकडांना ठार मारलं

  • Share this:

akola_monkey28 जानेवारी : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात माणुसकी अन् माणुसपणाचा थरकाप उडविणारी घटना घडलीये. घरावर उच्छाद मांडणाऱ्या माकडांवर संतोष खारोडे या व्यक्तीनं लोखंडी राॅडने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन माकडं  ठार झालीये तर तीन माकडं गंभीर जखमी झाली.

तेल्हारा शहरातील आसरामाता चौकात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलीये. संतोषनं लोखंडी रॉडनं माकडांवर हल्ला चढवला. यात दोन माकडांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन माकडं गंभीर जखमी आहेत. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक संवेदनशिल माणसाच्या ह्रदयाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

जखमी माकडांवर पशू वैद्यकीयकडून उपचार सुरू आहेत. तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संतोष खारोडेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आणि त्याला ताब्यात घेतलंय. संतोष हा महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 04:29 PM IST

ताज्या बातम्या