काँग्रेसमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर,नारायण राणेंचा मुंबईत प्रचाराला नकार

  • Share this:

narayan rane28 जानेवारी : काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ असणारे आक्रमक नेते नारायण राणे मुंबई निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहणार आहेत.मुंबई सोडून राणे इतर ठिकाणी प्रचार करणार आहेत.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर असलेल्या नाराजीमुळे नारायण राणेंनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांची मुंबई बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व नेत्यांनी निरुपम यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

एवढंच नाहीतर काँग्रेसचे दिल्लीचे निरीक्षक भूपिंदरसिंग हुडा यांच्यामार्फत राहुल गांधी यांनी वाद मिटवा आणि कामाला लागा असा आदेश दिला होता. मात्र, त्यानंतरही काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरूच आहे. आता राणे यांनी प्रचारातून अंग काढून घेतलंय. त्यामुळे शिवसेना-भाजपला तगडं आव्हान देण्याची भाषा करणारी काँग्रेस मुबंईत मात्र राणेंशिवाय प्रचार करणं तसं कठीणच जाईल असं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...