भाजपला पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नाही, पवारांचा 'दुसरा'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2017 05:07 PM IST

sharad_pawar3iv28 जानेवारी: राज्यातील भाजप सरकारला पाठिबा देण्याचा तूर्त विचार नाहीहा निर्णय एकत्र बसून घेण्याचा आहे असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगलीनंतर आता 'दुसरा' टाकलाय. तसंच शिवसेनेला आताच सत्तेतून बाहेर पडण्याची योग्य वेळ आहे अन्यथा लोकांमध्ये वेगळा संदेश जाईल असं म्हणत सेनेलाही त्यांनी डिवचलंय.

 शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर होते. या निमित्तानं आज कोल्हापूर महापालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना शरद पवार यांनी पुन्हा एकदा त्या प्रस्तावाबाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यातील भाजप सरकारला पाठिबा देण्याचा तूर्त विचार नाही. यावर राष्ट्रवादी एकत्र बसून निर्णय़ घेईल असं पवारांनी स्पष्ट केलं. मागील वेळा भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळीही आम्ही सेना आणि भाजप एकत्र यावं यासाठी पाठिंबा दिला होता असंही पवारांनी स्पष्ट केलं.

'सेनेनं सत्तेत राहु नये'

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय की, यापुढे युती करणार नाही. आता ते सत्तेत राहतील असं मला तरी वाटत नाही. जर राहिले तर सत्तेसाठी काहीही करता असा निष्कर्ष लोकं काढतील असं म्हणत त्यांनी सेनेलाही उचकावलं.

संजय निरुपम मूर्ख माणूस

Loading...

संजय निरुपम मूर्ख माणूस आहे. त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे. कोल्हापूरसाठी त्यांनी कधी काही केलंय का ?, ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. आणि ते लोक पदावर राहिले तर त्यांचं नाव असतं. पद गेल्यावर त्यांना कुणी विचारत नाही अशी टीकाही शरद पवार यांनी निरुपम यांच्यावर केलीये.

'राष्ट्रपतीपदाचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात आला नाही'

माझ्या पक्षाची संख्या किती ?,  आम्ही 12 ते 14 खासदार ? यात एवढीमोठी अपेक्षा ठेवू शकत नाही. मीडियानेही याबद्दल तारतम्य बाळगले पाहिजे. आपले पाय जमिनीवर राखले पाहिजे, आपली मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. आपली संख्या बघितली पाहिजे हे लक्षात घेऊन अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. राष्ट्रपतीपदाचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात आला नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...