आज भाजपचं शक्तीप्रदर्शन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युउत्तर

  • Share this:

fadanvis_on_virodhak28 जानेवारी : युती तुटल्यानंतर आज भाजप निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहे. मुंबईत भाजपचा विजय संकल्प मेळावा होतोय. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय आणि कसं उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यावर फडणवीसांनी फक्त एक ट्विट केलं होतं. मीडियाला त्यांनी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपच्या कोणत्या इतर नेत्यानंही सेनेला थेट उत्तर दिलं नाहीय. आज भाजपचा विजय संकल्प मेळावा मुंबईत गोरेगावला एनएसई ग्राऊंडवर संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम पक्ष यांच्याशी जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरला नाहीय. काल या सगळ्यांची बैठक झाली पण ती निष्फळ ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 01:03 PM IST

ताज्या बातम्या