ढेकणासंगे सेनेचा हिरा कदापी भंग पावणार नाही, सेनेचा भाजपवर 'बाण'

  • Share this:

sena bjp kdmc28 जानेवारी : पंचवीस वर्षांचा कालखंड वाया गेला, कुजला. त्या वाया गेलेल्या कालखंडाची पर्वा न करता शिवसेनेचा वाघ पुढे झेपावलाय. ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापी भंग पावणार नाही, अशा कडक शब्दात शिवसेनेनं आपल्या मुखपत्र सामनामधून भाजपवर 'बाण' सोडलाय.

युती तुटल्यानंतर आज 'सामना'मधून भाजपचा चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवसेना कर्त्या पुरूषाच्या भूमिकेत राहिली  मागणाऱ्यांच्या रांगेत भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापी भंग पावणार नाही, . शिवसेनेचा वाघ पुढे झेपावला आहे. जे पंचवीस वर्षांपूर्वी घडायला हवे होते ते आज घडत असले तरी महाराष्ट्राच्या मनात उसळून येणारा आनंद आम्हाला दिसत आहे असा विश्वास सेनेनं व्यक्त केलाय.

सत्ता आणि पैशांच्या जोरावर सर्वकाही जिंकायचे होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चूड लावून, गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या छाताडावर नाचून राक्षसी विजयोत्सव साजरे करायचे होते. आम्हाला फक्त आमचा महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचे रक्षण करायचे होते. त्यासाठी घाव झेलायला आमची छाती तयार होती. पण घाव पाठीवर झाले. गेल्या पन्नास वर्षांत असे असंख्य घाव पचवून शिवसेना उभीच आहे. कारण सत्तेच्या चार तुकडय़ांसाठी शिवसेनेचा जन्म नाही. खुर्च्या उबविण्यासाठी देव, धर्म, स्वाभिमान विकून खाणाऱया अवलादीच्या रांगेत शिवसेना कधीच ओशाळवाण्या चेहऱयाने उभी राहिली नाही असं सेनेनं भाजपला सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 12:47 PM IST

ताज्या बातम्या