...तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला काय हरकत? - मा.गो. वैद्य

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2017 10:59 PM IST

...तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला काय हरकत? - मा.गो. वैद्य

27 जानेवारी : शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ शकतं असं मत संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी व्यक्त केलं आहे. तसंच अस्थिर परिस्थितीत राष्ट्रवादीचा पाठिंबा का घ्यायचा नाही? असा सवाल उपस्थिती करत वैद्य यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा चालेलं असे संकेत दिले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी सेनेच्या मेळाव्यात युती तुटल्याची घोषणा केली. यावर संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी आयबीएन लोकमतला प्रतिक्रिया दिली. युती तुटल्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ शकतं अशी भीती वैद्य यांनी बोलून दाखवली.

२५ वर्षांच्या युतीनंतर आमची इतकी वर्षे युतीत सोडली, हा साक्षात्कार शिवसेनेला पालिका निवडणुकीपूर्वीच का झाला. इतकी  वर्षे सरकार उपभोगला तेव्हा शिवसेनेला का नाही कळाला असा टोलाही वैद्य यांनी लगावला.

तर दुसरीकडे शरद पवार यांनी भाजपचा प्रस्ताव आला तर त्यावेळी विचार करू असं सुचक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर वैद्य यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

उद्या जर शिवसेनेनं पाठिंबा काढला तर सरकार अस्थिर होईल किंवा राष्ट्रवादी पाठिंबा देईल पण अस्थिर परिस्थितीत राष्ट्रवादीचा पाठिंबा का घ्यायचा नाही? सरकार स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला नकार का द्यायचा ?असा सवालच मा.गो.वैद्य यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 10:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close