सेना-मनसे युतीची निव्वळ अफवा -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

raj_thackery_new27 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. युतीबाबत अफवा पसरवली जात आहे असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

गुरुवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच यापुढे युती करणार नाही असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. भाजप -सेना युती तुटल्यानंतर मनसेनं शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासाठी पुढं आली अशी चर्चा दिवसभर रंगलीये.

मनसेनं युतीसाठी शिवसेनेला प्रस्ताव दिला.एवढंच नाहीतर कोणत्याही अटी शर्तींवर सेनेला मनसेला पाठिंबा देणार असाही प्रस्ताव दिलाय. पण,  ही चर्चा बिनबुडाची आहे. असा कोणताही प्रस्ताव मनसेनं दिला नाही असं खुद्द राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. शिवसेना- मनसेच्या युतीच्या अफवा पसरवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, मनसे अजूनही निवडणुकीच्या आखाड्यात उतरली नाही. युतीच्या निर्णयाचं काय होतं याकडे सर्वपक्षीय नजर ठेवून होते. विशेष म्हणजे मनसेनं आपली रणनिती युतीच्या निर्णयावर आखून ठेवलीये. त्यामुळे आता युती शक्य आहे की नाही अशी एकाप्रकारे चाचपणी केली जात असल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 11:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close