News18 Lokmat

'पद्मावती'च्या सेटवर करणी सेनेची भन्साळींना मारहाण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2017 12:52 PM IST

'पद्मावती'च्या सेटवर करणी सेनेची भन्साळींना मारहाण

27 जानेवारी : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राजस्थानमध्ये मारहाण झाल्याची घटना घडलीय. संजय लीला भन्साळी हे महाराणी पद्मावतीवर चित्रपट बनवतायत. दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रिकरण जयपूरच्या जयगड फोर्टमध्ये सुरू होतं. यावेळी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या कलाकारांना मारहाण केली.

या चित्रपटाच्या लेखनामध्ये वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप संजय लीला भन्साळींवर करण्यात आलाय. त्यामुळे करणी सेना आक्रमक झाली. या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या भूमिका आहेत. पद्मावती चित्रपटाचं स्क्रिप्ट आम्ही पाहिलेलं नाही. पण रणवीर सिंगने एका मुलाखतीत दीपिका पदुकोण आणि त्याच्या काही प्रसंगांबद्दल सांगितलं त्यावरून करणी सेनेने या चित्रपटाला आक्षेप घेतला, असं

करणी सेनेचे सदस्य लोकेंद्र सिंग कलवी यांनी सांगितलंय.

याआधी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या जोधा अकबर सिनेमालाही करणी सेनेने विरोध केला होता. या चित्रपटाच्या रिलीजच्या आधी त्यामुळे वादही निर्माण झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...