बसायला गेले उघड्यावर पोलिसांनी नेलं चौकीवर !

बसायला गेले उघड्यावर पोलिसांनी नेलं चौकीवर !

  • Share this:

siload_newsसिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

27 जानेवारी : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये उघड्यावर शौचास बसणा-यांवर आज संक्रांत आली. कारण जिल्हा परिषद आणि सिल्लोड पोलिसांनी सकाळी सकाळी अचानक मोहिम सुरू केली.आणि उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची तारांबळ उडाली.कारण पोलिसांनी पाण्याच्या डब्ब्यासहित त्यांची धरपकड केली.

सिल्लोड शहराच्या आसपास उघड्यावर शौचास बसणाऱ्या 27 जणांना अटक केली. या सर्वांवर मुंबई पोलीस कायद्यानूसार 115 आणि 117 नूसार उघड्यावर शौचास बसणे आणि असभ्य वर्तन करणे या कलमांनूसार कारवाई केली. पोलिसांनी या सर्व दोषींना सिल्लोड न्यायालयात उभे केले असता. सर्वांना 400 रूपये प्रत्येकी दंड ठोठावून तंबी दिली. दोषींना दंड ठोठवून सोडून दिल्यानं त्यांना समाधान वाटलं. मात्र गावकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 08:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading