S M L

शेतकरी संपन्न झाला तरंच देशही संपन्न होईल -शरद पवार

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2017 08:37 PM IST

शेतकरी संपन्न झाला तरंच देशही संपन्न होईल -शरद पवार

संदीप राजगोळकर,कोल्हापूर

27 जानेवारी : देशातला शेतकरी कर्जबाजारी असेल तर देशही कर्जबाजारी असतो, त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरंच देशही संपन्न होईल असं प्रतिपादन देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केलंय. कोल्हापूरमध्ये आज खासदार धनंजय महाडिक यांच्या भिमा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते.

दरवर्षी कोल्हापूरमध्ये महाडिक समूहामार्फत कृषी प्रदर्शन भरवलं जातं. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवारांनी आजची शेती आणि तिची भविष्यातील परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. आज शेतकऱ्यांना पाठिंबा गरजेचा आहे असं सांगत नव्या तंत्रज्ञानाचा वापरही शेतकऱ्यांनी केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं.


या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनेक चर्चासत्रांचाही लाभ घेता येणार आहे. तर महाडिक समूहामार्फत यंदाचा भिमा कृषीरत्न पुरस्कार निवृत्त पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना तर भिमा कृषी जीवन गौरव पुरस्कार हा हातकणंगले तालुक्यातील चोकाकच्या जनार्दन पाटील यांना देण्यात आला. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांच्यासह नागिरक आणि शेतकरीही उपस्थित होते. पुढचे 4 दिवस हे कृषी प्रदर्शन सुरु राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 08:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close