नितेशची 'ती' चुकच, नारायण राणेंची टोचले कान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2017 10:35 PM IST

 नितेशची 'ती' चुकच, नारायण राणेंची टोचले कान

rane_newsroom27 जानेवारी : राजीनामा द्यायचाय तर लगेच द्या ना तो खिशात घेऊन फिरायला का लागलाय असा टोला काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी शिवसेनेंच्या मंत्र्यांना लगावलाय. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बॅगा भरुन ठेवल्यात म्हणजे काय केलंय अशी कोपरखळीही त्यांनी मारलीये. तसंच नितेश राणे याने पुतळा तोडणाऱ्यांना बक्षीस देऊन चूक केली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायचं सांगितलं होतं असं सांगत राणेंनी आपल्या मुलाचे कान टोचले.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात नारायण राणेंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी शिवसेना, शिवसेनाप्रमुख, कोकणाचा विकास आणि राजकीय प्रवासावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी 5 लाखाचं बक्षीस दिलं होतं. त्यावर नारायण राणे यांनी परखड भूमिका मांडली. जे चूक आहे ते चुक आहे. त्यांचं समर्थन होऊ शकत नाही. ज्या दिवशी नितेश राणेनं बक्षीस दिलं. त्यानंतर त्या प्रकरणावर मी त्याला दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिला होता असा खुलासा राणे यांनी केला.

'छगन भुजबळांद्दल दु:ख'

छगन भुजबळ यांच्या सध्य परिस्थितीवरही त्यांनी दु:ख व्यक्त केलं. राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. पूर्वी राजकारण राजकारणासाठी व्हायचं पण आता सूडाचे राजकारण सुरू आहे. भुजबळ मला ज्येष्ठ नेते होते, माझे सहकारीही होते. भुजबळ यांना आज जेलमध्ये जाण्याची वेळ ही त्यांच्यामुळे आली नाही तर त्यांना सुडापोटी जेलमध्ये टाकण्यात आलंय. अशा परिस्थिती राष्ट्रवादी त्यांच्या पाठिशी राहत नाही हे दुर्दैव आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच आजपर्यंत एकही आरोप निश्चित झाला नाही. माझ्या कुठेही 150 कंपन्यांना नाही, आणि परदेशात पैसाही नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचे सगळे आरोप हे बिनबुडाचे आहे असंही राणेंनी ठणकावून  सांगितलं.

वारसदार कोण ?

Loading...

कोकणात आपला वारसदार कोण असले या प्रश्नावर राणे म्हणाले, नितेश आणि निलेश दोघेही चांगलं काम करताय. एक जण आमदार आहे, एक जण खासदार राहिलाय. त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. मी त्यांना त्यांची कामं सांगितली आहे. आपलं काम करून राजकारण करा असा माझ्या पहिल्यापासून नियम आहे. उगाच दुसऱ्याच्या खिश्यातून राजकारण करू नये असं सल्लाच राणेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...