27 जानेवारी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर भाजपसोबत काडीमोड घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तुमच्याशिवाय परिवर्तन घडेल अशी प्रतिक्रियाही दिली. पण, या प्रसंगाला मुख्यमंत्र्यांच्या होममिनिस्टर साक्षीदार होत्या. देवेन इट्स गुड फॅार यू अशी दाद त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
आयबीएन लोकमतच्या न्यूजरुमचर्चा कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीविजा आणि घरच्या गोष्टींचा खुलासा केला. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस त्यावेळी आपल्या निवास्थानी होते. त्यांनी आपल्या शेजारी बसलेल्या अमृता फडणवीस यांच्याकडे पाहुन 'युती तुटली' असं सांगितलं. त्यावर अमृता फडणवीस यांनी 'देवेन इट्स गुड फॅार यू' असं म्हटलं.
तसंच फडणवीस यांच्याबद्दल हलक्या फुलक्या किस्स्यांबद्दलही त्यांनी सांगितलं. फडणवीस आणि मी सर्वात शेवटचा सिनेमा हा लगान पाहिला होता असं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या डाईटबद्दल त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री फडणवीस घरी असल्यावर त्यांना चाॅकलेट खाण्याचा मोह आवरत नाही. ते स्वत: फ्रीजमधून चाॅकलेट घेऊन फस्त करत होते. आता त्यांची सवय काही बदलता येत नाही. म्हणून मी फ्रीजचं बदलला आणि लाॅक असणार फ्रीज खरेदी केला. त्याची एक चावी माझ्याकडे असायची. त्यांच्या डाईटवर लक्ष ठेवण्याासाठी नियमावली तयार केली होती त्या प्रमाणे ते कुठेही असले तरी त्यांच्यासोबत एक मुलगा त्यांना याची आठवण करून द्यायचा असा किस्साही त्यांनी सांगितला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा