मुंबईच्या ट्रॅफिकला सेनाच जबाबदार, भाजपची पोस्टरबाजी

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2017 05:05 PM IST

 मुंबईच्या ट्रॅफिकला सेनाच जबाबदार, भाजपची पोस्टरबाजी

27 जानेवारी : भाजप सेने युती तुटल्यानंतर आता भाजपने जोरदार पोस्टरबाजी सुरू केलीये. भाजपने विकासाचा मुद्दा पुढे करत शिवसेनावर निशाणा साधलाय. गेल्या 20 वर्षांत शिवसेनेनं मुंबई बकाल केली असं चित्र भाजपनं रंगावलंय.

उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती भाषणानंतर भाजप चांगलीच पेटून उठलीये. भाजपने आता पोस्टरबाजीला सुरुवात केलीये. शिवसेनेनं 20 वर्षांमध्ये काय केलं याचा पाढाचा वाचायला भाजपने सुरुवात केलीये. त्या आशयाचे पोस्टर्स भाजपनं प्रकाशित केले आहेत.

पोस्टरच्या माध्यमातून सेनेवर टीकेची झोड उठवताना  "गेल्या 20 वर्षातील शिवसेनेच्या प्रगतीची वाटचाल" या शिर्षकाखाली भाजपने पालिकेतील विविध घोटाळ्यांवर टीका केली आहे..टॅब खरेदी, नालेसफाई घोटाळा, रस्त्यांची दुरावस्था, झोपडपट्टी चा प्रश्न या  यावरून भाजपने सेनेवर केलेल्या टीकेचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. विशेष म्हणजे मुंबईमध्ये वाढत्या ट्रफिकला शिवसेनेचा जबाबदार असल्याची टीकाही भाजपने केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close