S M L

जम्मूतील हिमस्खलनात महाराष्ट्रातले तीन जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2017 08:04 PM IST

 जम्मूतील हिमस्खलनात महाराष्ट्रातले तीन जवान शहीद

27 जानेवारी : जम्मूतल्या गुरेजमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातल्या 3 जवानांचा समावेश आहेत. दोन जवान हे अकोला जिल्ह्यातले आहेत. तर एक जवान बीड जिल्ह्यातले आहेत. आनंद गवई आणि संजू खंदारे हे अकोला जिल्ह्यातील आहेत. तर विकास समुंद्रे  हे बीड जिल्ह्यातले आहेत.

काल गुरेज क्षेत्रात बांदिपोरा जिल्ह्यातल्या हिमस्खलनामुळे लष्करी छावणीतील 17 जवान गाडले गेल्याची भीत व्यक्त करण्यात आली. लष्कराने हाती घेतलेल्या बचावकार्यात बुधवारी 15 जवानांचे पार्थिव हाती लागले. या बचावकार्यातून फक्त एका जवानाला वाचवण्यात यश आलं. या 15 जवानांमध्ये महाराष्ट्रातील 3 जवानांचा समावेश आहे. दोन जवान हे अकोला जिल्ह्यातले आहेत. तर एक जवान बीड जिल्ह्यातले आहेत. आनंद गवई आणि संजू खंदारे हे अकोला जिल्ह्यातील आहेत. तर विकास समुंद्रे  हे बीड जिल्ह्यातले आहेत.

तर दुसरीकडे काश्मीरमधल्या सोनमर्गमध्ये बुधवारीही हिमप्रपाताची घटना घडली होती. यात एका लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू ओढवला होता. काश्मीरमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी होत असल्यामुळे आणखीही हिमप्रपाताच्या घटना घडू शकतात, असा अलर्ट जारी करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 04:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close